इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मानवी हक्क, कौशल्य विकास, सायबर सुरक्षितता या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रम प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. डी. के. भेरे उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. भाबड यांनी निवड आधारित श्रेयांक पध्दतीचे महत्त्व व उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले. कौशल्य विकासाच्या पध्दतीविषयी त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतांना कौशल्य प्राप्त करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डी. के. भेरे यांनी केले. पंकज निकाळजे, किरण मते, कु. अनिता भोपे, श्रुतिका बारगजे, कु. निशा या विद्यार्थांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला एम़. ए. मराठी, अर्थशास्त्र, वाणिज्य याविषयाचे विद्यार्थी, तसेच प्रा. डी. एस. गायकवाड, प्रा. महाले, प्रा. मोहन, प्रा. श्रीमती जोशी उपस्थित होते.
