कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करा : तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

इगतपुरी तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी शुक्रवारी स्वतः ग्रामीण रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली. यावेळी शासनाची लसीकरण मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले. दरम्यान,लसीकरण सुरू झाल्यापासून लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांसह शासकीय कर्मचारी यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ स्वरूपा देवरे यांनी यावेळी सांगितले. यात जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. यावेळी इगतपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिपक पाटील, पोलिस उपनिरीक्षक शरद सोनवणे यांनीही लसीकरण करून घेतले. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर, श्री साई सहाय्य समितीचे राजेंद्र देवळेकर, सामाजिक कार्यकर्ते सत्तार मणियार, अजित पारख, गणेश घाटकर आदी उपस्थित होते.

इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे कोरोना लसीकरण करून घेतांना