शिक्षण संस्थेच्या विरोधात कवडदरा शाळेसमोर विविध मागण्यांसाठी शिक्षकाचे उद्यापासून आमरण उपोषण

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

महात्मा गांधी जयंतीदिनी भारत सर्व सेवा संघ पाचेगाव ता. नेवासा जि. अहमदनगर या शैक्षणिक संस्थेत अनागोंदी कारभार होत असलेला अन्याय आणि अपहाराविरोधात शिक्षक चंद्रकांत महादू जाधव आमरण उपोषणाला बसणार आहेत. उद्या 2 ऑक्टोबरपासून कवडदरा येथील शाळेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचे चंद्रकांत जाधव यांनी कळविले आहे.

त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, चंद्रकांत महादू जाधव हे भारत सर्व सेवा संघ संचालित शैक्षणिक संस्थेत 2012 च्या नियुक्ती आदेशाप्रमाणे सेवेत आहेत. सेवेत असल्यापासून त्यांना वेठबिगारी कामगारा सारखे वागवले जात असून वेतन दिले जात नाही. शासन आदेशाप्रमाणे दरमहा रुपये 39 हजार चारशे रुपये वेतन मिळणे आवश्यक असताना दिले जात नाही. त्या सर्व रकमेचा संस्थाचालकांनी अपहार केलेला आहे. संस्थेत रिक्त असलेल्या पदावर विनाअनुदानित ऐवजी अनुदानित पदावर सेवा ज्येष्ठतेने बदली करण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. त्याऐवजी अन्य लोकांना त्यामध्ये भ्रष्टाचारी कारभारातून नेमणूक करण्याचे संस्था संचालकांचे धोरण ठरलेले आहेत असे निवेदनात नमूद आहे.
याबाबत भारत सर्व सेवा संघ संस्थेला रजिस्टर पोस्टाने पाठवलेले निवेदन अस्वीकृत केल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप द्वारे पाठवण्यात आले. परंतु त्याकडे दुर्लक्षितपणा झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध संस्थेच्या कवडधरा येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या आवारात उद्या दुपारी 12 वाजेपासून आमरण उपोषण करणार असल्याचे चंद्रकांत जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!