इगतपुरीनामा न्यूज दि. १९ ( इगतपुरी ) :
येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. संध्या गव्हाणे यांची सकाळ माध्यम समूहाचे ‘यंग इनस्पिरेटर्स नेटवर्क’ ( YIN ) च्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात, मिळालेल्या संधीचं सोनं करता येणं हेच खरं शिक्षण असतं असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. या सत्काराप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. आर. एम. आंबेकर, प्रा. डॉ. डी. डी. लोखंडे, प्रा. बी. सी. पाटील, प्रा. यू. एन. सांगळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी किरण मते या महाविद्यालयातील विद्यार्थ्यानेही आपले अनुभव विद्यार्थ्याना सांगितले. संध्या गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. जागतिक वन दिनाच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहाकडून मिळालेल्या १० झाडांचे महाविद्यालयाच्या परिसरात प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड आणि विद्यार्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रा. के. के. चौरसिया, प्रा. श्रीमती एस. के. शेळके , प्रा. जी. एस. लायरे, प्रा. श्रीमती जे. आर. भोर आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यू. एन. सांगळे यांनी केले.