इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात गेल्या २ वर्षांपासून आरोग्यसेवक पदावरून आरोग्य सहाय्यक पदोन्नती प्रलंबित होती. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने नियमित पाठपुरावा करून पदोन्नती संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची मागणी लावून धरली होती. संघटनेच्या प्रयत्नांमुळे अखेर ३१ जणांना आरोग्य सेवक पदावरून आरोग्य सहाय्यक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. संघटनेच्या मागणीनुसार प्रशासनाने गतिमान निर्णय घेऊन पदोन्नतीचा निर्णय घेतल्याबद्धल पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांनी संघटनेचे ऋण व्यक्त केले आहेत.
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, प्रशासन अधिकारी प्रकाश थेटे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शेखर पाटील, सूर्यकांत मैद, स्वप्नील कोठारकर यांनी पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला. संघटनेच्या वतीने ह्या सर्वांचे आभार मानण्यात आले. संघटनेच्या वतीने राज्य समनव्वयक बाळासाहेब ठाकरे, राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, राज्य कार्यकारी सचिव बाळासाहेब कोठुळे, जी. पी. खैरनार, जिल्हाध्यक्ष विजय सोपे, विलास पगार, अनिल धोंडगे, सुरज हरगोडे, सुभाष कंकरेज यांनी ह्या प्रकरणी सातत्याने प्रयत्न केले. विलास पगार, राजा वाघ, अनिल धोंडगे, प्रवीण पाटील यांच्यासह 31 आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती मिळाली आहे.