कवयित्री : सौ. माधुरी पाटील शेवाळे, नाशिक
शिक्षकाच्या व्यवसायात
असतात सारे रचनाकार
माती समान गोळ्यांना
देत विविध पैलू आकार…!!१!!
निष्पाप निरागस बालके
असे त्यांची श्रद्धा गुरूवर
गिरवी धडे कौशल्याचे
विसरून जात घरदार…!!२!!
विद्यार्थी दैवत मानून
करीतसे कार्य तत्पर
गावाच्या विकास प्रति
लावत नेहमी हातभार..!!३!!
भावी पिढी देशासाठी
ध्येय असे आमच्यापुढे
गुणवैशिष्ट्ये ओळखुनी
शिकवित अक्षर अंकपाढे…!!४!!
नसे शिक्षणी भ्रष्टाचार
ध्यास असे गुणवत्तेचा
सिद्ध करून स्वतःला
लेकरांना धडविण्याचा…!!५!!
विविध उपक्रम राबूनी
घेऊनी सर्वांना प्रवाहात
देऊनी परिपूर्ण शिक्षण
नवी ओळख समाजात…!!६!!
निर्माण करू नवी पिढी
नको रहावयास अज्ञान
सर्वगुणसंपन्न बालकेच
होती उद्याचे सज्ञान…!!७!!