खेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी

जखमी आवडू सोमा आवाली

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याने एका इसमावर हल्ला चढवला आहे. हल्ला झालेल्या इसमाचे नाव आवडू सोमा आवाली आहे. तो शेतातून घरी येत असताना रस्त्यात शनिवारी ( दि. १३ ) रात्री साडेनऊच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला. सदर व्यक्तीला नासिक येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक आहे. आठ दिवसापूर्वी देखील एका चिमुकलीवर याच परिसरात बिबट्याने हल्ला चढवला होता. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.