सामाजिक जाणिवेतून घोटीत गरिबांना मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

आपल्याला जर संकटात सापडलेल्या गरजुंची मदत करण्याची संधी मिळाली तर ते आपले परम भाग्य समजावे. कारण निसर्गाने त्या संकटात मदत करण्यासाठी तुमची निवड केली हा तुमचा सर्वात मोठा बहुमान आहे असे मत घोटी येथे मदतकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील घोटी ह्या येथे तीन झोपड्यांना भीषण आग लागून तीन कुटुंबे अक्षरशः उघड्यावर पडली. भयाण रात्री डोळ्या देखत आपला सोन्यासारखा संसार जळत असतांना उराशी लेकराला घेऊन रडणाऱ्या मातांचा टाहो ऐकून दगडांनाही पाझर फुटावा अशी हृदयद्रावक घटना ऐकून सामाजिक जाणीव असलेले काही हात मदतीसाठी पुढे आले.
नाशिकचे राजकुमार भाटिया, अश्विनीकुमार भारद्वाज यांनी ह्या तीन कुटुंबांना धान्य, कपडे, चप्पल बूट, तेल आदी वस्तूची मदत देण्याचे निश्चित केले. त्यानुसार घोटी येथील सामाजिक कार्यकर्त्या दिपा दीपक कंदकुरीवार यांच्या मदतीने पिडीत कुटुंबापर्यंत मदत पोहोचवुन खऱ्या मानवतेचे दर्शन घडविले. कोरोनाच्या भीषण संकटात डोक्यावरील छत्र हरविलेल्या ह्या कुटुंबाना दिपा कंदकुरीवार यांनीही स्वतः आर्थिक मदत करुन ह्या तीन गरीब कुटुंबांना मानसिक आधार दिला. मदत वाटपप्रसंगी घोटीच्या सामाजिक कार्यकर्त्या दिपा दिपक कंदकुरीवार, ग्रामपालिका सदस्या वैशाली गोसावी, अलका गोरे, तेजल रतिष राय, दिपकजी कंदकुरीवार, ललितजी गोरे, सुहासजी खाडे, आयुष कंदकुरीवार आदींनी सहकार्य केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!