राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदी प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांनी नगर जिल्ह्यातील टाकळी खातगाव या छोट्याशा खेड्यातून सामान्य कुटूंबातून उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. याशिवाय सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात एका विभागाचे सर्वोच्च पद मिळविणे तितके सोपे नाही. केवळ कष्ट, जिद्द, सर्व क्षेत्रांसाठी आगळे काम करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
चांगले काम आणि माणसे जोडण्याचा छंद जोपासून प्रामाणिकपणे काम केले तर यश नक्की मिळाल्याशिवाय राहत नाही. हा वस्तुपाठ त्यांनी राज्यातील युवकांपुढे घालून दिला आहे. नूतन पदाधिकारी प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून आपली निवड सार्थ ठरवावी अशा शुभेच्छा प्रा. राम जाधव यांनी दिल्या आहेत. प्रा. वैभव फटांगरे, प्रा. डॉ. रामकिसन ढोकणे, प्रा. गोरख भगत, प्रा. लक्ष्मण बनसोडे, प्रा. शिदेश्वर शिंदकुंमठे यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.