इगतपुरीच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव ; टाकेदमध्ये सापडले ७ कोरोना बाधित रुग्ण ; ग्रामपंचायतीकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णाचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पूर्व भागातील एकमेव प्रमुख बाजारपेठ सर्वतीर्थ टाकेद बुद्रुक येथे दोन दिवसांत ७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे स्थानिक प्रशासनासह ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे. कोरोना बधितांमध्ये दोन शिक्षक असून ते कोविड लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. यावेळी केलेल्या कोरोना तपासणीत ते कोरोना बाधित आढळले आहेत. टाकेद येथील नवीन अयोध्या नगर मध्ये आरोग्य सेविका बी. एन. सोनवणे यांचा तपासणीत ७ जण सापडले आहेत. कोरोना बाधित भागात ग्रामपंचायत प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून संपूर्ण परिसर बंद केला आहे. दवंडीद्वारे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दोन आठवड्यांपासून बुधवारचा आठवडे बाजार कडेकोट बंद ठेऊन ग्रामपंचायत प्रशासनाकडून जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे. ग्रामस्थ नागरिक व्यापारी दुकानदार वर्गाने उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोना रोखण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच ताराबाई रतन बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, ग्रामविकास अधिकारी शिवाजी भामरे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम भांगे, सतिष बांबळे, केशव बांबळे, डॉ. श्रीराम लहामटे, ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई शिंदे, पौर्णिमा भांगे, लता लहामटे, कविता धोंगडे, रोहिणी नांगरे, भीमाबाई धादवड, आरोग्य सेविका बी. एन. सोनवणे, पोलीस पाटील प्रभाकर गायकवाड, मदतनीस,अंगणवाडी सेविका,यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी सतिष जाधव, सागर दवंडे, लालमन नांगरे, किशोर पवार, सुभाष मेमाणे आदींनी केले आहे.

टाकेद बुद्रुक गावात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना उपसरपंच रामचंद्र परदेशी, ग्रामविकास अधिकारी शिवाजी भामरे आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी.