राज्यातील माय बहिणींचे रक्षण करून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना बांधली राखी : माजी आमदार कन्या तथा तालुकाध्यक्ष शैला कुंदे यांच्यासह महिलांनी केले औक्षण

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्यातील माय बहिणींचे रक्षण करून त्यांच्यावरील होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार सातत्याने करावा. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या घोटीत आगमनावेळी माजी आमदार कन्या तथा तालुकाध्यक्ष शैलाताई कुंदे यांनी रक्षाबंधनानिमित्त त्यांना राखी बांधली. त्यांचे औक्षण करीत राज्यातील माय बहिणींसाठी आगामी काळात पक्षाच्या वतीने भावाची जबाबदारी पूर्ण करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे इगतपुरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. इगतपुरीच्या महिला तालुकाध्यक्ष शैलाताई कृष्णा कुंदे यांनी नूतन प्रदेशाध्यक्ष मुंबईकडून नाशिककडे येथे विविध प्रकारचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने उत्साहपूर्वक स्वागताची तयारी केली होती. याप्रसंगी आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष संगीताताई पाटील, उपजिल्हाध्यक्ष मिराताई भोईर, कळवण अध्यक्ष खुशी मोरे, संगीताताई जाखेरे यांनी प्रत्यक्ष संवाद साधून राजकीय सामाजिक विषयांवर चर्चा केली. मुंबई नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरी घोटी टोलनाक्यावर ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महिलांनी त्यांचे औक्षण करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावेळी महिलांना त्यांचे रक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी शब्दबद्ध असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!