कोरोना काय आहे ?

बालकवी पियुष गांगुर्डे
इयत्ता ७ वी, नाशिक
संपर्क :९९२२४११७७१

कोरोना काय आहे ?

कोरोना मानवाला स्वच्छतेचे
महत्त्व सांगणारी व्यक्ती आहे
पटपट फैलाव करणारी
अगरबत्ती आहे.
न बोलता न सांगता सारा देश
विळख्यात घालणारी शक्ती आहे

कोरोना काय आहे ?

सर्वांना घराच्या बाहेर पडायला
अडवणारा दरवाजा आहे.
ज्यामुळे सर्वांच्या शाळेला
कामाला मिळालेली रजा आहे.
लोकांना मृत्यूमुखी पाडणारी
एक सजा आहे.

कोरोना काय आहे ?

जुन्या मालिकांना मिळालेली
उजळणी आहे
कोरोनाला घरात बसणे
हेच औषधपाणी आहे.
घरातच बसा घरातच बसा
ही माझी विनंती
तुमच्या चरणी आहे.

( बालकवी पियुष गांगुर्डे पवननगर नाशिक येथील जनता विद्यालयात इयत्ता ७ वी मध्ये शिकतो. )

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!