त्र्यंबकेश्वरला आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे जयंतीने इगतपुरी विधानसभेचे उमेदवार अनिल गभाले यांच्या प्रचाराला दमदार प्रारंभ : विकासाला गतिमान करण्यासाठी शिक्षित व सामाजिक दृष्टीकोन असलेला उमेदवार अनिल गभाले यांना निवडून द्या

इगतपुरीनामा न्यूज – जनसामान्य व आदिवासी समाजात क्रांती घडविणारे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिमांचे पुजन करून यांना अभिवादन करण्यात आले. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचे जनसंवादी पार्टीचे उमेदवार बिरसा ब्रिगेड सह्याद्री / सातपुडा आदिवासी जनसेवक अनिल गभाले यांच्या प्रचाराला धडाक्यात सुरवात करण्यात आली. याप्रसंगी शेकडो आदिवासी बांधवांनी राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन  केले. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुके आदिवासी बहुसंख्य आहेत. या भागातील आदिवासींच्या सामाजिक विकासाच्या दृष्टीने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षित व सामाजिक दृष्टीकोन असलेला उमेदवार निवडुन विकासाला गतिमान करण्यासाठी सक्षम उमेदवार अनिल गभाले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प हाती घेघेण्यात आला. अनिल गभाले यांच्यासोबत समाज बांधव व सर्वसामान्य जनता एकवटल्याने अनेक मातब्बर नेत्यांनी धसका घेतल्याचे दिसत आहे.

शिक्षण, निवारा, पाणी, रस्ते, रोजगार यासह शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचवुन इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागाचा कायापालट करण्याचा निर्धार करण्यासाठी अनिल गभाले उमेदवारी करीत आहेत. त्यांची निशाणी करवत असून या निशाणी समोरील बटन दाबुन मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन अनिल गभाले यांनी यावेळी केले. प्रचार रॅलीत मनमोकळे मार्गदर्शन करीत अनिल गभाले यांनी आपल्या उपस्थितांचे प्रबोधन केले. इगतपुरी तालुक्यात सोनोशी येथे बाडग्याची माची या ठिकाणी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक आदिवासी समाजाच्या विकासाला बळ देणारे व स्फुर्तीदायी ठरेल असेही ते म्हणाले. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाले. याप्रसंगी युवानेता सचिन गभाले, नवसु घारे, शिवाजी दराणे, संतोष निरमुडे अमृता भले, पांडुरंग पालवे, संतोष हिलम, तानाजी शिंदे, बुधा मेंगाळ, रामदास भगत, बलराम घोडे, संजय शिंदे यांच्यासह शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!