इगतपुरीनामा न्यूज – काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष व अपक्ष उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र पहावयास मिळत असताना परिवर्तन महाशक्ती महाराष्ट्र स्वराज पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. शरद तळपाडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या अगोदरच डॉ. शरद तळपाडे यांनी दोन्ही तालुक्यातील भाग पिंजून काढल्याने जनसंपर्क वाढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन स्वराज्य पुन्हा उदयास आणणार असल्याचे डॉ. तळपाडे म्हणाले. सुशिक्षित व सुसंस्कृत निष्कलंक चेहरा देण्याच्या तयारीत मतदार आहेत. ते सध्या मतदारसंघात भिंगरी लावून फिरत आहे. गावागावात त्यांना तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. संभाजी राजे छत्रपती यांनी आखून दिलेल्या विविध प्रकारच्या नियोजनातून स्वराज्य अनेक प्रश्न सोडवत आहे. अठरा पगड जाती बारा बलुतेदारांचा “स्वराज्य” महाराष्ट्राच्या राजकारणातील सक्षम पर्याय होऊ पहात आहे. हा पक्ष बारा बलुतेदारांचा अठरा पगड जातींचा आहे. शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार या पंचसूत्रीवर “स्वराज्य” काम करीत आहे. आगामी विधानसभा यांचे तोरण याच मतदारसंघातून बांधले जाईल याचा ठाम विश्वास वाटतो. मला गोरगरीब जनतेची सेवा करायला आवडते. मला त्यांच्या समस्यांची चांगलीच जाणीव असून त्यांच्या विकासाच्या दृष्टीने उमेदवारी करीत आहे. जनतेने मला संधी द्यावी असे अधिकृत उमेदवार डॉ शरद तळपाडे यांनी केले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group