‘वंचित’चे उमेदवार भाऊराव डगळे यांच्या प्रचार नियोजनासाठी शनिवारी इगतपुरीत महत्वाची बैतक : सर्वांनी उपस्थित राहण्याचे विक्रम जगताप यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम आणि इगतपुरी तालुका शाखा, मार्गदर्शक ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार व कार्याध्यक्ष भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार सर्व माजी श्रामनेर बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका सर्व तालुका पदाधिकारी, इगतपुरी शहर कार्यकारिणी, घोटी शहर शाखा, ग्रामशाखा, तळेगाव ग्रामशाखा, जानोरी, नांदगाव ग्रामशाखा यांच्यातर्फे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊराव डगळे यांच्या प्रचाराबाबत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सुगत बुद्ध विहार इगतपुरी येथे शनिवारी सकाळी ११ वाजता ही बैठक होईल. बैठकीला भारतीय बौद्ध महासभा सर्व पदाधिकारी, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

यावेळी नाशिक पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रवीण बागुल गुरुजी, जिल्हा महासचिव राजू जगताप, कोषाध्यक्ष मनोज गाडे गुरुजी, वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्ष पवन पवार, नाशिक महानगरप्रमुख दामोदर पगारे,.जिल्हा संरक्षण सचिव मनोज मोरे, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र सचिव चेतन गांगुर्डे आदी उपस्थित राहणार आहेत. भारतीय बौद्ध महासभा इगतपुरी तालुकाध्यक्ष बळीराम शिरसाठ महासचिव अनिकेत उबाळे, शहराध्यक्ष कृष्णा पंडित, महासचिव एन. के. सोनवणे, वंचित बहुजन आघाडी इगतपुरी तालुकाध्यक्ष विक्रम जगताप, महासचिव मिलिंद शिंदे, इगतपुरी शहराध्यक्ष सचिन  चोपडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन इगतपुरी तालुकाध्यक्ष हनुमंत साबळे, बौद्ध महासभा महिलाध्यक्ष विजया बर्वे, वंचित बहुजन आघाडी इगतपुरी तालुका महिलाध्यक्ष संगिता शेणोरे, इगतपुरी वंचित महिला शहराध्यक्ष रंजना साबळे आदी मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीला सर्वांनी हजर रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी इगतपुरी तालुकाध्यक्ष विक्रम जगताप यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!