इगतपुरीनामा न्यूज, दि. 30
इगतपुरी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत असले तरी नवे पॉझिटिव्ह रुग्णही वाढतच आहेत. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार 45 नव्या रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आज एकाच दिवशी 30 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दिवस अखेर पर्यंत 340 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
पोलीस, आरोग्य, महसूल प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते कोरोना विरोधातील लढ्यासाठी जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. इगतपुरी तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास लवकरच इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
लस अवश्य घ्या.. प्रतिकारशक्ती वाढवा
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर नियमित उपचार करतांना आपली सुरक्षा काय ? असा प्रश्न जेव्हा आम्हा डॉक्टरांच्या मनात येतो तेव्हा लसीकरण हेच एकमेव उत्तर असते. म्हणून सर्वप्रथम लस घेऊन मी स्वत:चे जीवन सुरक्षित केले. आता कोरोना रुग्णांवर निश्चिंतपणे उपचार करत आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली तरी लसीमुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडी तुम्हाला पुर्णपणे सुरक्षित ठेवतात. लस अवश्य घ्या ‘लस’ तुम्हाला प्रतिकार शक्ती प्रदान करेल.
– डॉ. वैशाली ठाकरे- गायकवाड, वैद्यकीय अधिकारी काननवाडी
कोरोना व्हायरसचा ( Covid-19 ) संसर्ग झाला आहे की नाही ? हे तपासून पाहण्यासाठी रक्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही. कोरोना लक्षणग्रस्त व्यक्तीचे घशातील स्त्रावाचे नमुने आणि नाकातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही ? हे ठरवलं जातं. अन्यथा, रुग्णाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहणं आवश्यक आहे. ह्या आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.