इगतपुरीनामा न्यूज – इंग्रजीच्या समृद्धीकरणासाठी व विद्यार्थांच्या मनातील भीती दुर करण्यासाठी स्पेलिंग बी स्पर्धा उपयुक्त असून स्पर्धां परिक्षांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन इगतपुरीचे गटविकास अधिकारी प्रशांत पवार यांनी केले. इंडिया अँड आशिया बुक ऑफ रेकॉर्डस, जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने आज गोंदे दुमाला येथे झालेल्या स्पर्धेत इगतपुरी तालुक्यातील ७७२ विद्यार्थ्यांनी एकाचवेळी सहभाग नोंदवत इतिहास घडवला. पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धाच्या उदघाटनाप्रसंगी श्री. पवार बोलत होते. गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील म्हणाले की, स्पेलींग बी हा महत्वांकाक्षी प्रकल्प संपुर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार आज तालुकास्तरीय रेकॉर्डब्रेक स्पर्धा नियमांनुसार ४ थी ते ८ वीत शिक्षण घेणाऱ्या सर्व गटातील ४०७ मुले व ३६५ मुली अशा एकुण ७७२ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. परिक्षक म्हणुन सना शेख व माधुरी सोनवणे यांनी कामकाज पाहिले.
इगतपुरी तालुक्यातील १८ केंद्रातील २१० शाळांमधील ४०७ मुले व ३६५ मुली अशा एकूण ७७२ विद्यार्थांनी एकाच वेळी एकाच छताखाली येत ५० स्पेलिगांचे श्रुतलेखन केले. एका स्पेलिंगच्या लिखाणासाठी ३० सेकंदांचा वेळ देण्यात आला होता. या स्पेलिंगमध्ये चार ते शब्दांपर्यंत असणाऱ्या लहान मोठ्या स्पेलिंगचा समावेश होता. आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा बहुमान मिळवला.यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी अशोक मुंढे, शिवाजी आहिरे, पोषण आहार अधिक्षक सुरेश सोनवणे, केंद्रप्रमुख राजेंद्र नांदुरकर, सिद्धार्थ सपकाळे, प्रमोद परदेशी, जनार्दन कडवे, अशोक कुमावत, विजय पगारे, मधुकर दराडे, राजेंद्र मोरकर, विलास महाले, विलास वाजे, भाऊसाहेब आहेर, निवृती नाठे, सुभाष गादड, विजय साने, संदीप शिरसाट, बाप्पा गतीर, बाळासाहेब मुर्तडक,उत्तम आंधळे, स्मिता खोब्रागडे, विविध शाळांचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. ह्या स्पर्धेत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी दाखवलेली चुणुक, गती व अचुकता याबाबत परिक्षक सना शेख यांनी कौतुक केले.