विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन नाव उंचवावे : पीआय सारिका अहिरराव : मेंगाळवाडी जि. प. शाळेत शालेय साहित्य वाटप संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात येण्यासाठी सामाजिक सहकार्य गरजेचे आहे. शिक्षणासाठी अडचणी दूर करून शक्य ती मदत करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन घेऊन नाव उंचवावे असे आवाहन वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी केले. मेंगाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पोलीस नाईक प्रवीण काकड यांनी शालेय साहित्य वाटप केले. सामाजिक बांधिलकीमधून आदिवासी दुर्गम भागात विद्यार्थ्यांना साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. याप्रसंगी पोलीस नाईक प्रवीण काकड यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मुख्याध्यापक शिवाजी फटांगरे, शिक्षिका माधवी साळुंके, होमगार्ड रोहित सोनवणे, शालेय समिती अध्यक्ष खंडू भारती आदी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!