ठाणे एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना पोलीस महासंचालक विशेष पदक जाहीर : इगतपुरी तालुक्यातही केली होती उत्कृष्ट कामगिरी

इगतपुरीनामा न्यूज – ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस महासंचालक विशेष पदक जाहीर झाले आहे. नाशिक येथे महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक पदक प्रदान करण्यात येणार आहे. विशेष पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी इगतपुरी तालुक्यातील घोटी, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून अतिशय चोख असे काम बजावले असून अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. गिरड ता. भडगाव येथील ते भूमिपुत्र आहेत. घोटी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना त्यांनी जादू टोण्यातील खुनाचा गुन्हा उघडकीस आणून १० आरोपींना जन्मठेपेची जन्मठेप झाली. श्री. मनोरे यांच्या महाराष्ट्र पोलीस दलात ३४ वर्षाच्या सेवेत नाशिक शहर, नागपूर शहर, नाशिक ग्रामीण व ठाणे ग्रामीण आदी ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ह्या काळात खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणले. कायदा व सुव्यवस्था प्रश्न सतर्कतेने हाताळत कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक म्हणून सूक्ष्म पद्धतीने पारदर्शक काम केले. याची दखल घेऊन त्यांना महत्वपूर्ण असणारे विशेष पदक जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस, इगतपुरीसह, पाचोरा येथून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!