आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रयत्नांनी लेकबील फाटा ते साकुर फाटा रस्त्यासाठी ६२ कोटींचा निधी मंजूर : परिसरातील शेतकरी आणि व्यावसायिकांना होणार फायदा

इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रयत्नांनी लेकबील फाटा ( व्हिटीसी फाटा ) ते साकुर फाटा रस्त्यासाठी ६२ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आला आहे. समृद्धी महामार्ग जोडरस्ता भूमीसंपादन कामासाठी हा निधी वापरला जाणार आहे. यामुळे जवळपास ५ वर्षांपासून अडगळीत पडलेला प्रश्न सुटल्याने ह्या भागातील शेतकऱ्यांनी आमदार हिरामण खोसकर यांचे आभार मानले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे सातत्याने आमदार हिरामण खोसकर यांनी ह्या विषयावर यशस्वी पाठपुरावा केला. ना. पवार यांनी तात्काळ दखल घेत ६२ कोटींचा निधी मंजूर केला. यामुळे लेकबील फाटा ते साकुर फाटा ह्या समृद्धी महामार्ग जोडरस्त्याचे रखडलेले काम सुरु होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोबदला सुद्धा मिळणार असून दळणवळण सुविधा वाढणार आहेत. रस्त्यालगत असणारे शेतकरी, व्यावसायिक आणि जमिनी यांचे मूल्यांकन वाढून ह्या भागाचा विकास व्हायला मदत होईल असा विश्वास आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केला. ६२ कोटी निधी मंजूर झाल्याने बेलगाव कुऱ्हे, अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य, कुऱ्हेगाव, नांदगाव बुद्रुक, साकुर आदी गावातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ह्या रस्त्यामुळे दारणा धरण भागात पर्यटन वाढण्यास सुद्धा हातभार लागणार आहे. उपचारासाठी एसएमबीटी रुग्णालयाकडे जाणाऱ्या रुग्णांना चांगला फायदा होईल. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत वेळेत जाण्यासाठी रस्त्याचा उपयोग होईल. या परिसरातील शेतकरी आणि व्यावसायिक नागरिकांना आमदार हिरामण खोसकर यांच्यामुळे आनंद झाला असून नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!