१ कोटी रुपये किमतीचा रेल्वेचा पार्ट चोरणारे २ संशयित आरोपी इगतपुरीतुन जेरबंद : पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि पोलिसांची कामगिरी

इगतपुरीनामा न्यूज – भारतीय रेल्वे टनेल कामासाठी लावलेला मशीनचा १ कोटी रुपये किमतीचा पार्ट चोरीस गेलेला आहे. याबाबत बिहार राज्यातील राजोली जि. नवादा पोलीस ठाण्यात २१ ऑक्टोबरला गु. र. क्र. 530/2023 भादवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल आहे. ह्या गुन्ह्यात राजोली पोलीस ठाणे प्रभारी त्यांच्या पथकासह संशयित आरोपीच्या शोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी केलेल्या लेखी विनतीवरून ह्या गुन्ह्यातील सहभागी निपुरा मनोरंजन राय वय ३०, नयन नरेश राय वय २३ ह्या २ संशयित आरोपींना इगतपुरी पोलिसांनी बिहार पोलिसांच्या स्वाधीन केले. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि पोलीस पथकाने कसोशीने शोध घेऊन ही कामगिरी केली. याबद्धल नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी कौतुक केले आहे. गुन्ह्यातील चोरी केलेला १ कोटी किमतीचा पार्ट पश्चिम बंगाल राज्यातील सिलीगुडी येथे पाठविला असल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली असून त्याबाबत खात्री झाली आहे. चोरीस गेलेला माल हस्तगत करणेकामी बिहार पोलिसांचे दुसरे पथक पश्चिम बंगालमध्ये रवाना झालेले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!