एसबीआय मध्ये व्यवस्थापक व्हायचंय ?

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क – ९८२२४७८४६३

भारतीय स्टेट बँक
भारतातील प्रमुख बँकेबरोबरच उत्कृष्ट करिअरची संधी भारतीय स्टेट बँकेने ( SBI ) उपलब्ध करून दिली आहे. जिथे तंत्रज्ञान आणि नाविन्याची परंपरा आहे. जिथे सर्व स्तरावर कर्मचाऱ्यांच्या मतांना महत्त्व दिले जाते. या बँकेमार्फत मॅनेजर ( क्रेडिट अॅनालिस्ट ) या पदाच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना एसबीआयमध्ये व्यवस्थापक होण्याची एक चांगली संधी आहे.

मॅनेजर ( क्रेडिट अॅनालिस्ट )
Manager  ( Credit Analyst ) या पदाच्या ग्रेड MMGS – 3 ( Middle Management Grade Scale – 3 ) ४५ जागा नियमित / कंत्राटी आधारावर भरावयाच्या असून यासाठी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेचा पदवीधर, MBA/ PGDBA/ PGDBM or their equivalent (with specialisation in Finance ) as 2- year regular Course. Candidate  having  qualification of CA/ CFA / ICWA (CMS ) are also eligible to apply.

तपशिलवार जाहिरात
पात्रतेच्या अटी, आवश्यक फी आणि इतर तपशील बँकेच्या https://bank.sbi/web/careers किंवा https://www.sbi.co.in/web/careers वेबसाइटवर  दिलेल्या तपशीलवार जाहिराती अंतर्गत उपलब्ध आहे. सोबत अर्ज आणि अर्जाची फी ऑनलाइन भरण्याची लिंक दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी आणि फी भरण्याआधी आपली पात्रता आणि इतर तपशीलाची खात्री करण्यासाठी तपशीलवार जाहिरात पहावी.

पदांसाठी आरक्षण
मॅनेजर ( क्रेडिट अॅनालिस्ट ) या पदांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण आहे.
०१. Gen. २० जागा
०२. OBC ११ जागा
०३. SC ०७ जागा
०४. ST ०३ जागा
०५. EWS  ०४ जागा

इतर माहिती
वयोमर्यादा, Specific  Skills, अनुभव, निवड प्रक्रिया, मुलाखत प्रक्रिया, कॉल लेटर, अर्ज करण्याची पध्दत, सर्वसामान्य सूचना, पदाचे कार्य, ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे व त्यासंदर्भातील सविस्तर माहिती वर दिलेल्या संकेतस्थळावर दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी याचा काळजीपूर्वक अभ्यास करून अर्ज करावा.

व्यवस्थापक होण्याची संधी
भारतीय स्टेट बँकेत व्यवस्थापक होण्याची ही एक चांगली संधी असून पात्र उमेदवारांनी बँकेच्या नियमाप्रमाणे अर्ज केल्यानंतर मुलाखतीची चांगल्या प्रकारे तयारी केल्यास उत्तम नोकरी मिळू शकते हे लक्षात घ्या.

( लेखक इगतपुरी येथील केपीजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )

Similar Posts

3 Comments

  1. avatar
    विलास जोपळे says:

    या जाहिराती चा पात्रता असलेल्या उमेदवारांनी..लाभ घ्यावा…

Leave a Reply

error: Content is protected !!