बेरोजगार तरुणांनो, विविध एकलव्य शाळांमध्ये विविध पदांच्या भरतीबाबत हे मार्गदर्शन वाचाच..!

– प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य इगतपुरी महाविद्यालय
                  संपर्क : 9822478463

भारतातील १७ राज्यांमध्ये एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयात प्राचार्य, उपप्राचार्य, पदव्युत्तर पदवीधर शिक्षक व प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या एकूण ३४७९ जागा भरावयाच्या आहेत. त्याविषयी मार्गदर्शक माहिती देणारा हा लेख…

एकलव्य मॉडेल निवासी शाळा
आदिवासी विकास विभागांतर्गत नवीन शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्यात १४ एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरु करण्यात येत आहे. यामध्ये एकूण २१६ पदांची भरती केली जाणार आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी या निवासी शाळा सुरू करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील विविध पदांसाठी भरती
या एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्राचार्य पदासाठी १६ जागा, उपप्राचार्य पदाच्या ८ जागा , टीजीटी ( Trained Graduate Teachers ), इंग्रजी, भौतिकशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, जीवशास्त्र २८ जागा. पीजीटी ( Post  Graduate Teachers ) इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, १६४ जागा अशाप्रकारे एकूण २१६ जागांसाठी भरती होणार आहे.

भारतातील विविध पदांसाठी भरती
भारतात १७ राज्यांमध्ये एकलव्य निवासी विद्यालयात शिक्षकांच्या स्टाफसाठी एकूण ३४७९ पदे भरली जाणार आहेत. प्राचार्य एकूण पदे १७५, उपप्राचार्य एकूण ११६ पदे, पीजीटी ( Post  Graduate Teachers ) १२४४ पदे,  टीजीटी ( Trained  Graduate Teachers ) १९४४ पदे अशा प्रकारे सर्वात मोठी शिक्षक भरती प्रक्रिया आहे. पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा.

अधिकृत संकेतस्थळ
ज्या पात्र उमेदवारांना या पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्यांनी https:// recruitment. nta.nic.in/webinfoEMRSRecruitment या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे. या माहितीचे काळजीपूर्वक वाचन करावे आणि अर्ज करावा.

महत्त्वाच्या तारखा
यासाठी महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.
■ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत ३० एप्रिल २०२१ आहे.
■ परीक्षेच्या संभाव्य तारखा मे महिन्याच्या शेवटचा आठवडा किंवा जून महिन्याचा पहिला आठवडा.
■ परीक्षेसाठी वेळ तीन तास असेल.

परीक्षेचे माध्यम व इतर माहिती
■ परीक्षेचे माध्यम हिंदी व इंग्रजी असेल.
प्राचार्य, उपप्राचार्य व पीजीटीसाठी १६० मार्कांचा ऑबजेक्टिव्ह आणि बहुपर्यायी स्वरूपाचा पेपर असेल. व्यक्तिमत्त्व चाचणी आणि मुलाखत ४० मार्क .परीक्षेचा कालावधी तीन तास राहिल.
■ टीजीटी पदासाठी १८० मार्कांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा असेल. परीक्षेचा कालावधी तीन तास असेल.
■ संगणकाधारित परीक्षा Computer  Based Test  असेल.
पदाप्रमाणे शैक्षणिक पात्रता व अनुभवाची अट आहे. एमएबीएड, एमकॉम, बीएड, एमएस्सीबीएड, बीएबीएड,  बीएस्सीबीएड, बीकॉमबीएड या पात्रताधारकांनी या संधीचा फायदा घ्यावा.
■ हिन्दी किंवा इंग्रजीमध्ये अध्यापन करता येणे आवश्यक आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाचे
या लेखात दिलेल्या संकेतस्थळावर अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. त्या माहितीचे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अवलोकन करणे गरजेचे आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करून परीक्षेची चांगली तयारी केल्यास शिक्षण क्षेत्रातील चांगल्या नोकरीची संधी प्राप्त करता येऊ शकते याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
             
( लेखक इगतपुरी येथील केपीजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आहेत. )

12 thoughts on “बेरोजगार तरुणांनो, विविध एकलव्य शाळांमध्ये विविध पदांच्या भरतीबाबत हे मार्गदर्शन वाचाच..!

  1. विविध पदाच्या संदर्भातील मार्गदर्शन अत्यंत प्रभावी व मोलाचे आहे.

  2. सर आपण अगदी सुंदर अशी माहिती दिली आहे..😊😊

  3. Economics च्या सर्व विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती धन्यवाद सर

  4. एकलव्य विदयार्थासाठी काढण्यात येणाऱ्या निवासी शाळेसाठी ज्या अध्यापकांच्या जागा भरावयाच्या आहे त्या संदर्भात आपण बेरोजगार विद्यार्थी साठी मार्गदर्शक सुचनांचा लेखामधुन जे मार्गदर्शन केलेले आहे ते त्यांना भविष्यात उपयुक्त ठरेल सर आपणास सुद्धा खुप खुप शुभेच्छा

  5. एकलव्य शाळांमधील शिक्षक भरती बाबत आपण केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त आहे. याचा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना नक्की फायदा होईल.

  6. एकलव्य शाळांच्या जवळजवळ साडेतीन हजार जागा भरावयाच्या आहे. या संदर्भात वरील मार्गदर्शन हे उमेदवारांसाठी विशेषत: कोरोना काळात उपलब्ध करून दिलेली सुवर्ण संधी आहे. याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. ही संधी उपलब्ध करून देणारे सर्व प्राध्यापक /गुरुवर्य निस्वार्थीपणे हे काम करीत असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही संधी उपलब्ध करून देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार

  7. अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त व मौलिक मार्गदर्शन .खूप खूप धन्यवाद सर

  8. अशा प्रकारची सविस्तर माहिती….सहज उपलब्ध करून दिलीत…त्या बद्दल आभारी…आहोत..नक्कीच या गोष्टीचा लाभ घेऊ…

  9. आदरणीय प्रा. गिरी सरांना मनपुर्वक धन्यवाद, आपल्या बहुमुल्य मार्गदर्शनाचा सुशिक्षित विद्यार्थ्यांनी निश्चितच फायदा घेतला पाहिजे, इतकी सविस्तर माहिती सरकारी नोकरभर्ती संदर्भात आपण दिलेली आहे, पुनश्र्च धन्यवाद,

Leave a Reply

error: Content is protected !!