इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
उषा अँड परमेश्वर स्नेहलता लखोटिया फाउंडेशन पूर्व मुंबई यांच्या सौजन्याने इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगडवाडी धामणी आणि तातळेवाडी येथील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट आणि विविध खाऊचे वाटप करण्यात आले. राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांच्या समन्वयातून थंडीपासून बचावासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप झाल्या. फाउंडेशनचे कमल लखोटिया, जयश्री लखोटिया यांच्या हस्ते वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. आदिवासी भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना भरीव आणि भरघोस मदत देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविल्याबदल शिक्षकांनी आभार मानले.
गांगडवाडी शाळेतील एकूण 95 तर तातळेवाडी शाळेतील 45 विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट आणि खाऊचे वाटप झाले. याप्रसंगी गांगडवाडी शाळेचे मुख्याध्यापक संजय चौरे, शिक्षक आशा सोनवणे, शंकर बांगर, तातळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संदिप पवार, धनराज भदाळे आदी उपस्थित होते. उषा अँड परमेश्वर स्नेहलता लखोटिया फाऊंडेशन ( पूर्वीची उषा चॅरिटेबल ट्रस्ट ) मुंबई यांचेकडून थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून ऊबदार असे ब्लँकेट, खाऊ म्हणून वेफर्स, सोनपापडी व डेअरी मिल्क, कॅडबरी वाटप करण्यात आले. राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांच्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना हा लाभ मिळाला असे उपस्थित शिक्षकांनी सांगितले.