
इगतपुरीनामा न्यूज – श्रीहरीकोटा येथून इस्रोने आज चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण केले. संपूर्ण भारत देशातील नागरिकांनी भारतीय अंतराळ विभागाच्या चांद्रयान प्रक्षेपणाची अभिमानास्पद कामगिरी टेलिव्हिजनद्वारे पाहिली.
इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी देखील हा ऐतिहासिक क्षण आपल्या डोळ्यांनी पाहिला. हा क्षण पाहताना विद्यार्थिनींची उत्खंठा शिगेला पोहचली होती. विद्यार्थिनींना हा ऐतिहासिक क्षण पाहता यावा यासाठी शाळेतील शिक्षकांनी प्रोजेक्टर लावून खास व्यवस्था केली होती. यावेळी शिक्षकांनी सर्वांना चांद्रयान बद्दल सविस्तर माहिती दिली.