इगतपुरीनामा न्यूज, दि. 21
जिल्हा शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांची साथ रोग निवारण ( कोविड 19 ) इगतपुरी तालुका संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या आदेशानुसार त्यांनी तातडीने कामकाज सुरू केले आहे. त्यानुसार श्री. म्हसकर यांनी पंचायत समिती इगतपुरी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी इगतपुरी तालुक्यातील साथरोग निवारण व सद्यस्थितीची माहिती गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्याकडून जाणून घेतली.
गटविकास अधिकारी लता गायकवाड यांनी तालुक्यातील कोव्हीड 19 च्या रुग्णांची सद्यस्थिती, प्रतिबंधित क्षेत्र, सुरू असलेल्या उपाययोजना यांची सर्विस माहिती दिली. यानंतर गटविकास अधिकारी लता गायकवाड यांनी शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्या सोबत तालुक्यातील सर्व 222 शाळांचे मुख्याध्यापक यांच्या सोबत 2 टप्प्यात विडिओ कॉन्फरन्स घेतली. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कोव्हीड 19 बद्दलच्या सर्व सूचना व खबरदारी घेऊन जबाबदारी पार पाडण्याबद्दल सर्व सूचना सर्व मुख्याध्यापक यांना देण्यात आल्या. सर्व सूचनांची अंमलबजावणी आम्ही यशस्वीरीत्या पार पाडू करू असा शब्द सर्व मुख्याध्यापकांनी दिला. आपला इगतपुरी तालुका हा कोरोनाच्या महामारीतून बाहेर काढण्यासाठी जीवाचे रान करू अशी ग्वाही सर्व प्रतिनिधींच्या वतीने सुनील सांगळे, प्राथमिक शिक्षक भावली यांनी दिली. विडिओ कॉन्फरन्स यशस्वी होण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे, अशोक मुंढे, नेरे साहेब यांनी विशेष प्रयत्न केले. मा जिल्हा शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी इगतपुरी तालुक्यात चालू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. उपशिक्षणाधिकारी निलेश पाटोळे हेही यावेळी हजर होते. वैतरणा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. नांदुरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group