
इगतपुरीनामा न्यूज, दि. 19
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या वतीने घेण्यात येणारा साप्ताहिक सामूहिक सत्संग सोहळा प्रत्येक रविवारी 280 ठिकाणी होत असतो. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व सत्संग सेवाकेंद्र संस्थानाच्या वतीने बंद केलेले आहेत. कोरोनाच्या या जैविक महामारीत भक्त गणांनी आपला आत्मविश्वास गमावू नये. ते आध्यात्मिक मार्गात येऊन त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा. कोणीही मनाने खचून जाऊ नये म्हणून जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानाच्या वतीने ओ. एम. एस. ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन सत्संग सुरू करण्यात आला आहे. हा सत्संग संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही रविवारी 11 एप्रिल ह्या दिवशी पासून प्रारंभ करण्यात आला आहे. ऑनलाईन पद्धतीने यापुढे हा सत्संग प्रत्येक रविवारी सकाळी 9 वाजता सुरु राहणार आहे. ह्या ऑनलाईन सत्संगाचा लाभ जास्तीत जास्त भक्तगण, साधक, शिष्य, चाहते, आदींनी घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप खंदारे, इगतपुरी तालुकाध्यक्ष संतोष थोरात, इगतपुरी तालुका महिला अध्यक्षा मनीषा गतीर, इगतपुरी तालुका निरीक्षक राजेंद्र उदावंत आणि जेष्ठ कार्यकर्ते शशिकांत धनु आदींसह इगतपूरी तालुका भक्त मंडळाकडुन करण्यात आले आहे.