इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ – नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथे विठू नामाच्या गजरात अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. यामध्ये सुप्रसिद्ध किर्तनकारांची कीर्तने सुरु आहे. यामुळे सातही दिवस हरिनामाचा जागर होत आहे. संत वाङमय व भारतीय तत्वज्ञानाचे थोर अभ्यासक व संशोधक म्हणून परिचित असलेले जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, हभप पंढरीनाथ महाराज सहाणे यांच्या मार्गदर्शनाने सप्ताहाला मोठ्या भक्तीभावाने सुरुवात झाली. यावर्षी सप्ताहाचे २० वे वर्ष आहे. हभप किशोर महाराज खरात, महेश महाराज तुपे, गणेश महाराज करंजकर, शिवा महाराज आडके, मनोहर महाराज सायखेडे, राहुल महाराज गायकवाड, ज्ञानेश्वर महाराज तुपे आणि जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. ग्रामस्थांरलतर्फे दररोज कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी व ग्रामस्थांसाठी दररोज महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group