डॉ. आंबेडकर ज्ञान दिवसानिमित्त आनंद बर्वे यांच्याकडून विविध उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. 18
इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक शहरात डॉ. बाबासाहेब आबेडकर निमित्ताने जयंती ज्ञान दिवस साजरा करण्यात आला. कोरोनाच्या अनुषंगाने ज्ञान दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने घोटी शहर व परिसरातील कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब व गरजू नागरिकांना अन्न वाटप, एक हजार नागरिकांना मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. आरपीआयचे युवक तालुकाध्यक्ष तथा टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष आनंद बर्वे ( ब्रदर ) यांच्याकडून घोटीचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सार्वजनिक वाचनालय, अभ्यासिकेला  डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोढें यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कवडे, घोटी ग्रामपालिकेचे माजी प्रभारी सरपंच संजय आरोटे, नाभिक समाजाचे जेष्ठ नेते अँड. सुनिल कोरडे, घोटी ग्रामपंचायत सदस्य समाधान जाधव यांनी उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद बर्वे यांच्यासह सहकारी बाळासाहेब भडांगे, विजय चंद्रमोरे, अनिल कडलग, सुमित बर्वे, लखन मोरे, रोहीत भडांगे, अनिल मोरे, दिपक दोंदे, देवा बर्वे, अविनाश केदारे, बाळु बर्वे, ब्रदर ग्रुप व टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!