महात्मा गांधी हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

इगतपुरीनामा न्यूज दि. १९ : इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य अनिल पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. शिवाजी महाराजांची कर्तृत्व डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे आचरण केल्यास नक्कीच उत्तम विद्यार्थी घडतील असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते कुणाल जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध युद्ध मोहिमा, महाराजांचे काटेकोर नियोजन आणि युद्धनीती याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून विविध स्फूर्तीगीते, पोवाडा गायन करत कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. पालक शिक्षक संघाचे गजानन गोफणे, उपप्राचार्य उमाकांत वाकलकर, पर्यवेक्षक लक्ष्मीकांत ठाकरे, अविनाश कुलकर्णी, हेमंत जोशी, प्रदीप रहाटे, डी. एल. पवार आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेमंत सोनजे, जितेंद्र पाटील, भगवान चौधरी यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण गुंजाळ यांनी तर सूत्रसंचालन ओवी कुलकर्णी हिने केले.

Similar Posts

error: Content is protected !!