कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असलेल्या कंपन्यांची तातडीने तपासणी करा : रिपाई कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल पवार यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ – इगतपुरी तालुक्यातील जिंदाल  कंपनीत रविवारी मोठी दुर्घटना घडली. यात कंपनीत काम करणारे कामगार किती मृत झाले किती जखमी झाले याबाबत अद्याप संदिग्धता आहे. या अग्नितांडवाने मोठा हाहाकार माजवला असून परिसरात विषारी वायूचे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गोंदे, वाडीवऱ्हे भागातील कंपन्यांमध्ये कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसते आहे. त्यानुसार कामगारांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे असल्याचे रिपाई, कामगार आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष अमोल पवार म्हणाले.

गेल्या पाच वर्षांच्या काळात गोंदे दुमाला येथील शालिमार कंपनी, लेकबील फाट्याजवळील बॉयलर कंपनीत अग्नितांडव पाहण्यास मिळाला होता. होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी कंपन्यांची योग्य यंत्रणेमार्फत तपासणी करावी अशी मागणी अमोल पवार यांनी केली आहे. मुंढेगावच्या दुर्घटनेमुळे कामगारांमध्ये भीती पसरलो असून त्तामुळे त्यांचा परिवार सुद्धा चिंताग्रस्त आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्वलनशील पदार्थांची निर्मित करणाऱ्या कंपन्यांची चौकशी करण्यात यावी असेही नाशिक जिल्हाध्यक्ष रिपाई कामगार आघाडीचे अध्यक्ष अमोल पवार यांनी म्हटले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!