देवळे येथील रायझिंग स्टार्स इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक मेळावा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – इगतपुरी तालुक्यातील घोटी जवळ असणाऱ्या देवळे येथील रायझिंग स्टार्स इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक मेळावा उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा भारत- अतुल्यता, प्रेम आणि आनंद या विषयावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शांतीलाल सुवालाल लुणावत, रमेश रघुनाथ चोपडा, देवळेचे सरपंच ज्ञानेश्वर उघडे, शेणवडचे उपसरपंच कैलास कडू, अशोक सुखलाल मोदी, रुपाली प्रशांत रूपवते उपस्थित होते. पूर्वप्राथमिक विद्यार्थ्यांनी नृत्याद्वारे उत्साहाने जीवन जगण्याचा संदेश दिला.

इयत्ता १ ली, २ री आणि ३ री मधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या नृत्यामधून आनंद व्यक्त करण्याच्या संदेश दिला. इयत्ता ४ थीतील विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना गाण्यांच्या सदाबहार युगात उतरवले. इयत्ता ५ वी आणि ६ वीतील विद्यार्थ्यांनी  भक्तीगीतांवर तर इयत्ता ८ मधील विद्यार्थिनींनी भारतातील ९ राज्यांच्या संस्कृती आणि परंपरांचे सौंदर्य दर्शवणारे नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका मनीषा सुरेश काजळे आणि सपना सुमतीलाल मोदी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!