
इगतपुरीनामा न्यूज, दि. ०६ : भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळा येथे दोनशे निवासी विद्यार्थ्यांना संविधान ग्रुप इगतपुरी शहरच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संविधान ग्रुपचे आयु. करुणाताई बर्वे, आयु. तेजस जगताप, राहुल देहाडे, गौतम गवारे, विशाल शिंदे, सचिन सोनकांबळे, सुनील जाधव, आकाश जाधव, संदीप रूपवते, सुनील जंजाळे, अखलाख शेख, जीवन पवार, सम्यक देहाडे, अभिनव सोनकांबळे, प्रणित जाधव आदीसह आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.