इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठा आणि बलाढ्य असा आड या किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहीम संपन्न झाली. या दुर्गम मोहिमेमध्ये गडावरील पाण्याचे टाके स्वच्छ करण्यात आले. माती मध्ये बुजलेले पाण्याचे टाके माती कडून स्वच्छ करण्यात आले. भविष्यात सर्वांना महाराजांचे गड-किल्ले समजावे या उद्देशाने हा वारसा जागृत ठेवण्यासाठी अनेक संस्थांमार्फत गडकिल्ल्यांवर संवर्धन मोहीम घेतली जाते.
सिन्नर तालुक्यातील शिवदुर्ग रक्षक, इगतपुरी तालुक्यातील शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्था, विल्होळी येथील गडदुर्ग संस्था, दिंडोरी येथील टीम देहेरगड या सर्व संस्थांच्या मावळ्यांनी मिळून किल्ल्यावर साफसफाई करून पाण्याचे टाके स्वच्छ करण्यात आले. यापुढेही सर्व संस्थांनी एकत्र येऊन नाशिक जिल्ह्यातील सर्व किल्ल्यांचे संवर्धनाचे काम केले पाहिजे असे शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेचे शाम गव्हाणे यांनी सांगितले. शिवदुर्ग रक्षकचे प्रवीण गीते यांनी सर्वांचे आभार मानले.