
इगतपुरीनामा न्यूज, दि. 7
समृद्ध फाउंडेशन घोटी, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 11 आणि 12 नोव्हेंबरला मोफत अपंग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. घोटी येथील सरस्वती विद्यालय यशवंत नगर, पोस्ट ऑफिस जवळ येथे हे शिबीर होईल. तपासणीनंतर 15 दिवसात आवश्यकतेनुसार पोलिओग्रस्त व्यक्तीसाठी केल्लीपर्स, कृत्रिम पाय, कृत्रिम हात ( कोपराच्या खाली ) कुबडी इत्यादी मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे.ह्या शिबिराचा नाशिक जिल्ह्यातील गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन समृद्ध फाउंडेशनचे अध्यक्ष देविदास पवार यांनी केले आहे अधिक माहितीसाठी देविदास पवार 93705558322, कोकिळा पवार 7249757319, गंगाधर जाधव 9881817405, चेतन वानखेडे 9766468422 यांना संपर्क साधावा.