इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
इगतपुरी तालुक्यातील भावली ग्रामपंचायत अंतर्गत धारवाडी, जामुंडे येथे प्रल्हाद ओमकारवती फाउंडेशन मुंबई यांचे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. ह्या शिबिराचा परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घेतला. मोरया क्रिकेट क्लब गणेश मंडळाच्या आमंत्रणाने आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, बबन आगिवले यांच्या समन्वयाने हे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विविध महिला आणि पुरुषांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे वाटप केली. यावेळी प्रल्हाद ओमकारवती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. मनुश्री मुखर्जी, सचिव डॉ. राजेश देसाई, कार्यकारी सदस्य शशिकांत न॑दनवार उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य अशोक सखाराम दरवडे, राजु सीताराम आगीवले, लक्ष्मण वाळु आगीवले आदी हजर होते. फाउंडेशनचे स॑चालक शशिकांत न॑दनवार यांनी प्रल्हाद ओमकारवती फाउंडेशनच्या कार्याविषयी माहिती देऊन आढावा घेतला. मंडळाचे सदस्य राजु पंढरीनाथ आगीवले, विलास विट्ठल दरवडे यांनी फाउंडेशनचे आभार मानले. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण आदिवासी भागाला सहाय्य होत असल्याबाबत नागरिकांनी फाउंडेशनची कृतज्ञता व्यक्त केली.