निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे भैरवनाथ मंदिराजवळ ओहोळात मृतदेह आढळला. आज दुपारी सोपान बेंडकोळी यांना शेतावर गायी चारत असतांना कुबट वास आला असता त्यांनी शहानिशा केली. ओहोळात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीच्या मुलाकडून ओळख पटवण्यात आली. अरुण सोमा पगारे वय ५५ रा. पिंपळगाव मोर हे दारू पिलेले असतांना तोल जाऊन ओहोळात पडले. गेल्या पाच दिवसांपासून मृतदेह जागीच पडून राहिल्याने दुर्गंधी सर्वदूर पसरली होती.
घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास, पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे, सहाय्यक उपनिरीक्षक राऊत यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी कामगार पोलीस पाटील लक्ष्मण काळे, सोपान बेंडकोळी, राहुल पगारे, चंद्रकांत पगारे आदी उपस्थित होते. उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय घोटी येथे पाठवण्यात आले.