इगतपुरी तालुक्याच्या सर्व ठिकाणी बैलपोळा मोठ्या उत्साहात : घोटी खुर्द येथे डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक ; माणिकखांबला उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा

इगतपुरीनामा न्यूज, दि. 26

इगतपुरी तालुक्यातील सर्व गावांमध्ये बैलपोळा अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी बांधव आनंदात आहेत. शेतकऱ्यांसाठी वरदान असणाऱ्या बैलांना पोळ्यानिमित्त विविध प्रकारे सजवण्यात आले. आबालवृद्धांनी अपार आनंदात चैतन्यमय वातावरणात सणाचा आनंद घेतला. तालुक्यातील घोटी खुर्द ह्या गावात पोळ्यानिमित्त बैलांची डीजे लावून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. गावातील तरुण, बालके, युवती आणि ग्रामस्थांनी मिरवणुकीचा आनंद घेतला. माणिकखांब येथे उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा संपन्न झाली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!