संरक्षण व पोलीस दलातील जवानांच्या आई वडिलांचा मुकणे ग्रामपंचायतीतर्फे सन्मान सोहळा

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

मुकणे येथील संरक्षण दलात व पोलीस दलात कार्यरत असलेल्या १६ जवानांच्या आईवडीलांचा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित मुकणे ग्रामपंचायतीतर्फे मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मुकणे येथील तरुण शासनाच्या सर्वच खात्यात नोकरीला आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संरक्षण व पोलीस खात्यात कार्यरत असलेले जवान नवनाथ कचरू राव, मधुकर पोपट राव, गणेश रमेश शिंदे, बबन किसन शिंदे, आकाश गणेश उबाळे, रवींद्र भास्कर साबळे, महेश सूर्यभान बोराडे, सुभाष लक्ष्मण चारस्कर, संदीप भास्कर आवारी, नामदेव सावकार राव, नवनाथ सावकार राव, गणेश हरिश्चंद्र राव, शैलेश बाळु भवर, रोहन भास्कर साबळे आदीं जवानांच्या आई वडिलांचा ग्रामपंचायतीने शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सहृदय सन्मान केला.

यावेळी घोटी बाजार समितीचे माजी संचलक विष्णु पाटील राव, मुकणेचे सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर चंदर राव, पोपट राव, गणेश राव, रामदास राव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी बोलतांना देशाच्या संरक्षणासाठी कुटुंबापासुन दूर राहुन देशसेवा करणाऱ्या जवानांच्या कुटुंबाचा सन्मान हा नेहमीच होणे गरजेचे असल्याचे गौरवोद्गार काढले. याच वर्षीपासून दहीहंडी उत्सव सुरू करणाऱ्या प्रवीण शिंदे, सुदर्शन आवारी, पप्पु आवारी, त्र्यंबक आवारी या तरुणांसह अपंग असुनही जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच झटणाऱ्या संतोष राव यांचाही सत्कार करण्यात आला. पोपट वेल्हाळ, लहानु साबळे, एकनाथ बोराडे, अनिल राव, भास्कर आवारी, दिलीप जाधव, कचरू राव, रमेश शिंदे, गणेश उबाळे, दिनकर बोराडे, सावकार राव, सौ.सत्यभामा राव, हिराबाई राव, मंगल शिंदे, लता उबाळे, ललिता साबळे, तारा भास्कर आवारी, मीरा राव, संगीता भवर, गणेश बोराडे, रवींद्र साबळे, नारायण गोवर्धने, दिपक राव, भोरू राव, सुनील राव, किरण भवर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रभाकर आवारी यांनी तर आभार सरपंच हिरामण राव यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!