इगतपुरीच्या माधुरी पाटील यांना ‘नारीशक्ती’ पुरस्कार

इगतपुरीनामा न्यूज, दि. 8

स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन व ‘महाराष्ट्र वूमन टीचर्स फोरम’च्या वतीने नाशिक जिल्ह्यातील आठ कर्तृत्ववान महिला शिक्षकांना नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षिका माधुरी पाटील यांना नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीमती पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांचा आढावा घेऊन त्यांना महिला व बालकल्याण उपायुक्त अर्चना तांबे यांच्याकडून गौरवण्यात आले. यावेळी नाशिक जिल्ह्यातील नलिनी आहिरे, माधुरी पाटील, अनुराधा तारगे, संध्या देवरे, मनीषा साळवे, वैशाली भामरे, विजया लिलके, स्वाती मुसळे या शिक्षिकांनाही गौरवण्यात आले.