इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयाने सन २०२०-२०२१ व सन २०२१-२०२२ या वर्षाची सेवकसंच निश्चिती ( संचमान्यता ) जिल्हा नुसार शिबिर सुरू केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर येथे होणाऱ्या संचमान्यता शिबिरामध्ये नवीन आदेश सांगण्यात आला की 20 टक्के अंशतः अनुदानित व विनाअनुदानित उच्चमाध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना ‘ब’ वर्ग तक्त्यात समाविष्ट करून संच मान्यता करावी. परंतु याचा फार गंभीर परिणाम या शिक्षकांना भोगावा लागू शकतो. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना एकूण पगारापैकी २० टक्के पगार नुकताच सुरू झाला आहे. आत्तापर्यंत संचमान्यता करत असताना सर्व शिक्षकांचा ‘अ ‘ तक्त्यात समावेश करण्यात आला. परंतु या वर्षापासून ‘ब’ तक्त्यात समावेश केला तर त्यांची सेवाशाश्वती, सेवाजेष्ठता, विद्यार्थी संख्येअभावी सेवा समाप्ती देखील होऊ शकते. असे गंभीर परिणाम होऊ नये म्हणून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटनेने पुणे विभागीय सहाय्यक उपसंचालक मीना शेंडकर यांना निवेदन दिले.
याप्रसंगी शिक्षक भारती संघटनेचे नगर जिल्हा कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, जिल्हा सरचिटणीस महेश पाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रामराव काळे, सल्लागार कैलास रहाणे, तालुकाध्यक्ष श्याम जगताप, प्रसिद्धीप्रमुख अमोल चंदनशिवे, उपप्राचार्य राजेंद्र धमक, नरेश खाडगिर, विनाअनुदान विरोधी संघर्ष समिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष दिनेश शेळके, कार्याध्यक्ष केदार भिंगारदिवे, महिला अध्यक्ष रूपाली कुरुमकर, अकोले कार्याध्यक्ष गणपत धुमाळ, सुनील मंडलिक, मनोहर राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते. या मागणीला राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, कनिष्ठ महाविद्यालयीन विभागाचे राज्याध्यक्ष आर. बी. पाटील, राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, उपाध्यक्ष सचिन जासूद, रुपाली बोरुडे, माफीज इनामदार, प्रवीण मते, संपत वाळके, सचिन लगड, संजय तमनर, जिल्हा समन्वयक योगेश देशमुख, संजय भालेराव, गोवर्धन रोडे, संतोष निमसे, दादासाहेब कदम, संजय पवार, सोमनाथ बोनंतले आदी पदाधिकाऱ्यांनी मागणीला पाठिंबा दिला.