इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
मायदरा, टाकेद खुर्द, धानोशी, ठोकळवाडी या गावांच्या एकत्रित असलेली मायदरा आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी आहे. ह्या संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, श्रीपत पाटील लगड, यशवंत केवारे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व १३ जागा निवडून आलेल्या होत्या. आज घेण्यात आलेल्या चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदावर आनंदा ढवळू घोरपडे व दत्तू मल्हारी केवारे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.
आनंदा घोरपडे यांना सूचक नामदेव ठोकळ तर अनुमोदन नामदेव लांघे यांनी दिले. दत्तू केवारे यांना सूचक तुळशीराम केवारे व अनुमोदन महादू केवारे यांनी दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक सहकार अधिकारी श्रीमती शिंदे यांनी काम पाहिले. त्यांना श्री. टोचे तसेच संस्थेचे सचिव कैलास बऱ्हे यांनी सहाय्यक म्हणून काम केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक नामदेव ठोकळ, गंगाराम धोंगडे, जयराम लोहकरे, नामदेव लांघे, यशवंत करवंदे, तुळशीराम केवारे, अनुसया गभाले, महादू केवारे, अनुसया केकरे, पार्वता लोहकरे, जिजाबाई लगड उपस्थित होते. बिनविरोध निवड घोषित होताच उपस्थित टाकेद खुर्दचे श्रीपत पाटील लगड , सरपंच सचिन बांबळे, उपसरपंच कैलास पांडे, मायदराचे माजी सरपंच यशवंत केवारे, सामाजिक कार्यकर्ते बहिरू लगड, संतु घाणे, शिवाजी लगड, माजी चेअरमन त्र्यंबक घाणे, वाळू बगड, खंडू केवारे, प्रा. पंढरीनाथ केवारे, बाळू पांडे, बहिरू घोरपडे, देवराम घोरपडे, एकनाथ वाघ, जालिंदर गभाले, पांडू केकरे, तुकाराम केवारे, हरी केवारे आदींनी स्वागत केले. नवनिर्वाचित चेअरमन आनंदा घोरपडे व व्हॉइस चेअरमन दत्तू केवारे यांचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार शिवराम झोले, काशीनाथ मेंगाळ, माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, माजी सभापती राजाराम धोंगडे, रामदास जाधव, हरिश्चंद्र नाठे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.