इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीच्या कामगारांना सरासरी १४ हजार ३५१ रुपयांची भरघोस पगारवाढ मिळाली आहे. भारतीय कामगार सेना युनियन आणि महिंद्रा व्यवस्थापनाने पगारवाढीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खा. अरविंद सावंत, चिटणीस प्रकाश नाईक यांच्यासह भारतीय कामगार सेना स्थानिक युनिट पदाधिकारी यांनी करारपत्रावर सह्या केल्या आहेत. शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, इगतपुरीचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील रोकडे, शिवसेना तालुकाप्रमुख व इगतपुरी महिंद्र भा. का. सेना युनिट अध्यक्ष कामगार नेते भगवान आडोळे आदींनी व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. साडेतीन वर्ष मुदत असणाऱ्या ह्या करारामुळे कामगारांना सेवाजेष्ठतेनुसार कमाल ७६ हजार रुपये मिळणार आहेत. ह्या महत्वपूर्ण कराराचे कामगारांनी स्वागत केले आहे. भरघोस वेतनवाढ सोबत त्यावर आधारित बोनस व ग्रॅज्युटी रक्कम अतिरिक्त असेल. या व्यतिरिक्त सेवानिवृतीनंतर शिल्लक आजारी रजा या पूर्णपणे रोखीत रूपांतरीत करता येतील. याशिवाय अतिरिक्त प्रतीवर्षी दोन भरपगारी रजाही मिळविण्यात भारतीय कामगार सेना युनियनला यश मिळाले आहे.
हा महत्वपूर्ण करार करण्याच्या प्रसंगी महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीतर्फे कंपनी वाहन उद्योग समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष के. जी. शेणॉय, कामगार औद्योगिक संबंध विभागाचे उपाध्यक्ष विजय नायर, चाकण व इगतपुरी प्लांटचे वरिष्ठ उत्पादन प्रकल्प प्रमुख संजय क्षीरसागर, इगतपुरीचे महाव्यवस्थापक राजेश खानोलकर, महिंद्र कांदिवली महाव्यवस्थापक टाॅम थॉमस, कामगार औद्योगिक संबंध विभागाचे सिनिअर व्यवस्थापक संदीप गिजरे, वाणिज्य विभागप्रमुख आदित्य दिक्षित, प्लांट इंजिनिअरिंग विभाग प्रमुख सयाजी जाधव, उत्पादन प्रमुख राजेंद्र शेवाळे, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खा.अरविंद सावंत, चिटणीस प्रकाश नाईक, दिलीप जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, इगतपुरीचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील रोकडे, शिवसेना तालुकाप्रमुख तथा स्थानिक युनिट पदाधिकारी अध्यक्ष भगवान आडोळे, चिटणीस अर्जुन भोसले, उपाध्यक्ष तुकाराम गाढवे, सहचिटणीस रोहिदास चौधरी, खजिनदार रमेश अहिरे, कमिटी मेंबर राजेंद्र कदम, प्रदीपसिंह राजपूत सुनील यादव यांनी सह्या केल्या.