महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवावेत : हिंदवी स्वराज्य ग्रुपतर्फे रूपेश नाठे यांचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

महावितरण ही जनतेची कंपनी असून तिला वाचवून सक्षम करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. परंतु कोव्हिड-19 महामारीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचे वीज बिल सरसकट माफ करावे. त्यांना इतर व्यावसायिकांप्रमाणे वागणुक द्यावी. विज कापली असल्याने शेतकऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. रात्रीच्या वेळेला शेतामध्ये जंगली प्राण्यांचा वावर असल्याने माणुसकी धर्म लक्षात घेऊन दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी हिंदवी स्वराज्य ग्रुपतर्फे रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी केली आहे. लवकरच याबाबत शेतकरी आणि अधिकाऱ्यांची समन्वय बैठक घेण्यात येईल असे आश्वासन इगतपुरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

शेतकऱ्यांना अनेक सवलती व सहकार्य करण्यास महावितरण अधिकारी तयार आहेत. दिवसा वीज पुरवठा, ट्रान्सफॉर्मर आणि इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असा शब्द हिंदवी स्वराज्य ग्रुपला देण्यात आला. निवेदन देतेवेळी प्रणव जाधव, सोहम धांडे, संजय कश्यप, अजय कश्यप, राम नाठे, भुषण शिरोळे, नामदेव कोकणे आदींसह शेतकरी बांधव हजर होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!