इगतपुरीनामा न्युज, दि. 11
इगतपुरी तालुक्यातील निनावी येथील संजय राजाराम गायकवाड यांच्या दुकानाचे आणि घराचे काही दिवसांपूर्वी आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे त्यांना प्रचंड मोठ्या आर्थिक हानीला सामोरे जावे लागले. हे माहीत झाल्याने राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव झनकर व्यथित झाले. यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून त्यांना भरीव आर्थिक मदत केली. सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनीही गृहोपयोगी वस्तूंची चांगली मदत यावेळी केली. खंडेराव झनकर यांनी केलेल्या मदतीमुळे माझ्या कुटुंबाला आणि मला मोठा आधार मिळाल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले. खंडेराव झनकर यांच्या सामाजिक उत्तरदायित्वामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
आगीच्या आपत्तीमुळे संजय गायकवाड हे उमदे व्यक्तिमत्व पुन्हा उभे करणे आवश्यक होते. त्यानुसार सर्वांच्या मार्गदर्शनाने त्यांना शक्य ते साहाय्य केले. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च टाळून मदत केल्याचा खूप आनंद झाला.
- खंडेराव झनकर, संस्थापक अध्यक्ष राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान
निनावी येथे संजय राजाराम गायकवाड यांच्या दुकानासह घराला काही दिवसांपूर्वी आग लागली. त्यामध्ये सर्व चीजवस्तू भस्मसात झाल्या. या तरुणाला पुन्हा नव्या जोशाने उभा करण्यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी गृहोपयोगी वस्तू सुपूर्द केल्या. राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्टानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव झनकर यांनीहु वाढदिवसाचा खर्च टाळून गायकवाड कुटूंबाला आर्थिक मदत सुपूर्द केली. या कुटुंबाने माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, सभापती सोमनाथ जोशी, माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, जेष्ठ शिवसैनिक हरिभाऊ वाजे, साहेबराव झनकर आदींचे साश्रु नयनांनी आभार मानले.