इगतपुरीनामा न्यूज, दि. २
महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक दिंडोरी येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल आहेर, सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीकांत पन्हाळे यांनी कामकाज पाहिले. सर्व पदांसाठी एक एक अर्ज आल्याने खेळीमेळीमध्ये निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून सुधाकर शिलाटे, तालुकाध्यक्ष यशवंत गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष महेंद्र गवळी, तालुका उपाध्यक्ष प्रियंका कुडके, अस्मिता अहिरे, उज्वला गावित, तालुका सचिव राहुल राऊत, तालुका खजिनदार म्हणून प्रकाश ठाकरे, तालुका प्रसिद्धीप्रमुख म्हणून संदिपकुमार बोरवे तर तालुका संघटक नितिन वसावे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली,
निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपविभागीय कृषी अधिकारी राकेश वाणी, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, ललित सूर्यवंशी, प्रमोद गोलाईत, अनिल साठे, कृषि पर्यवेक्षक प्रशांत जाधव, विठ्ठल रंधे, पंडित कनोर, श्यामकांत पाटील, मंगेश जंगम, संजय सावंत, उत्तम भुसारे, सहाय्यक अधीक्षक सुधीर भालेराव, मनोज वाटाणे, संदीप पगारे, छाया सोनवणे, दीपक बिरारी, तुकाराम पीठे, देविदास महाले, शिवदास पवार, एस. आर. बहिरम, सुधाकर ठोकळे, दिगंबर पगार, पंकज माळी, मेघश्याम डमाळे, बाबासाहेब काळे, भास्कर निकम, अनिल डोखळे जयसिंग हरिचंद्रे, पंकज भदाणे, विजय पवार, पुंडलिक गवळी, सुनिल भोये, योगेश जोपळे भाऊसाहेब वाघमोडे, प्रतिक भरसट, मनिषा बांगर, पी. आर. गावित, मनिषा पाटील, रेणुका सातपुते, रुपाली लोखंडे, प्रतिभा माघाडे, अश्विनी भदाणे, छाया आखाडे, मनिषा सावंत, राजेंद्र धाकराव, गरुड, शेवरे, शेवाळे आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.