घोटी येथील केंद्रशाळेत न्युट्रिटीव्ह स्लाईस वाटप संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

घोटी येथील मुले नं. १ केंद्रशाळेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नाविव्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना न्युट्रिटीव्ह स्लाईस ( बिस्किटे ) वाटप करण्यात आली. पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र पवार, शालेय पोषण आहार अधिक्षिका प्रतिभा बर्डे, शिक्षण विस्ताराधिकारी कैलास सांगळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक भगत, घोटी १ चे केंद्रप्रमुख योगेश भामरे, विशेष शिक्षक बाप्पा गतीर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक जहिर देशमुख यांनी न्युट्रिटीव्ह स्लाईस विषयी माहिती दिली. कार्यक्रमाला शिक्षक गोरख खतेले, प्रशांत गुजराथी, प्रशांत वाघ, अंजना कोकणी, दिलिप झुरडे, गोरक्षनाथ नरोडे व विद्यार्थी पालक उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!