इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
मुंबई-आग्रा महामार्गावर आज सकाळी ७ च्या दरम्यान एसएमबीटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. ह्या अपघातामध्ये एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाचे २५ विद्यार्थ्यांसह कर्मचारी जखमी झाले आहे. या जखमींना आडगाव नाका येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर येथे उपचार सुरू आहेत. यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिक येथून धामणगाव येथे असलेल्या एसएमबीटी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांना घेऊन महाविद्यालयाची MH 15 EF 2526 ही बस जात होती. बस बघून रोड कडे लागत असताना औरंगाबाद नाशिक महामार्गावरील तपोवनाजवळ असलेल्या हॉटेल मिरची येथील वळणावर औरंगाबाद वरून येत असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे बस पलटी झाली. त्या बस मध्ये सुमारे 25 जण जखमी झाले आहे. या जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे तर कोणाचे हात कोणाचे पाय तुटला असल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून आलेली माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते