इगतपुरीनामा न्यूज, दि. २
सर्वांगीण क्षेत्रात नवनवे विक्रम करून गावागावांत विकासाचे मॉडेल खऱ्या अर्थाने रुजवणारे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके गौरवशाली व्यक्तिमत्व आहे. सामान्य माणूस केंद्रीभूत ठेवून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाही ग्रामविकासामध्ये सहभागी करण्यात त्यांचा वाटा आहे. आगामी काळात गोरख बोडके यांच्या दूरदृष्टीने इगतपुरी तालुक्यात अधिकाधिक विकासाची कामे होऊन विकासाची गंगा धावणार आहे असे गौरवोद्गार इगतपुरी तालुक्यातील विविध लोकनियुक्त सरपंचांनी काढले. नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी सार्थ निवड झाल्याबद्दल इगतपुरी तालुक्यातील लोकनियुक्त सरपंचांनी शिरसाठे गटाचे कार्यसम्राट माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांचा शानदार सत्कार आयोजित केला. यावेळी सर्वांनी गोरख बोडके यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पारदेवी त्रिंगलवाडीचे सरपंच अशोक पिंगळे, पिंपळगाव भटाटाचे सरपंच बळवंत हिंदोळे, धार्णोलीचे सरपंच रमेश पथवे, खैरगावचे सरपंच ॲड. मारुती आघाण, माणिकखांबचे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, बलायदुरीचे सरपंच हिरामण दुभाषे, देवळेचे सरपंच ज्ञानेश्वर उघडे, धारगावचे सरपंच निवृत्ती पादीर, खंबाळेचे सरपंच कैलास शिद, जगन्नाथ ठोंबरे, बलायदुरीचे माजी सरपंच मल्हारी गटखळ, ग्रामपंचायत सदस्य जनार्दन भगत आदी उपस्थित होते. गोरख बोडके यांनी आभार मानतांना म्हटले की, सर्वांचा विश्वास सार्थ ठरवून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लोकाभिमुख कामे करण्यास बांधील आहे.