इगतपुरीनामा न्यूज (प्रतिनिधी)
इगतपुरी दि. ३१ : तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या हेडगेवार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. कोरोना काळात देखील संस्थेने आपली विश्वासाहर्ता टिकून ठेवली असून संस्थेला एक कोटी पेक्षा जास्त नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन हेमंत सुराणा यांनी दिली. कोरोना काळात संस्थेकडून समाजपयोगी कामे करत ग्राहकांची विश्वासाहर्ता टिकवून ठेवली आहे. चांगल्या प्रकारे नफा कमावणारी पतसंस्था म्हणून प्रसिद्ध आहे. कोरोना काळात सेवाकार्य म्हणून नागरिकांना औषध व काढा वाटप करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी काही सभासदांनी संचालकांना सूचना केल्या की संस्थेने इतर ठिकाणी स्वतःच्या जागा घ्याव्यात तसेच गोडाऊन स्कीममध्ये स्वतःच्या मालकीचे गोडाऊन उभे करावे अशी सूचना विजय कर्नावट यांनी केली. आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्व संचालक मोहन बबरेवाल, रमेश चोपडा, परशराम भगत, गोरख वालझाडे, संपत म्हसने, सुनील पिचा, दिलीप भन्साळी आदी उपस्थित होते.